PCMC :ACB रेड ज्ञानेश्वर पिंगळे,यांनी 16 नगरसेवक यांची नावे सांगण्यास नकार दिल्याने. नितीन लांडगे यांच्यासह चौघाच्या पोलीस कोठडीत वाढ
PCMC.अॅन्टी करप्शनच्या रेड..पीए ज्ञानेश्वर पिंगळे, यांनी 16 नगरसेवक यांची नावे सांगण्यास नकार दिल्याने स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह चौघाच्या पोलीस कोठडीत अजून दोन दिवसाची वाढ
’पुणे – 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Corporation) पुण्याच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption) मोठी कारवाई 18 ऑगस्ट ला करण्यात आली होती. ज्ञानेश्वर पिंगळे, यांनी 16 नगरसेवक यांची नावे सांगण्यास ACB च्या अधिकऱ्यांना नकार दिल्याने आज पून्हा सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली होतीपिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (दि. 23) वाढ करण्यात आली आहे.
होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै वर सोळा जणांना द्यावे लागतात असे सांगितले होते. ते सोळा जण कोण आहेत, याचा तपास केला. मात्र, त्यांची नावे सांगण्यास नकार देण्यात आला आहे.
“टक्केवारीचे पैसैवर सोळा जणांना द्यावे लागतात.अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे याला तीन टक्के ऐवजी 2 टक्के करा असा आदेश दिला होता त्या व्हॉइस कॉल ची पडताळणी करायची असल्याचे ACB कडून कोर्टात सांगितले तसेच हे 16 जण कोण आहेत यांची माहिती आरोपी कडुन घ्यायची आहे पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील रमेश वानखेडे यांनी केली त्यानुसार सोमवार पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली .