मुसलमानांना देखील इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे:नाना पाटेकर

पुणे : काश्मीरमध्ये वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. ते ही आपलेच असून दोन तीन पिढ्या पूर्वी कन्व्हर्ट झाले आहेत. सगळ्यांमधला माणूस शोधायला हवा, येणारा प्रत्येक जण हा जाणार आहे याच्यावर विश्वास ठेऊन चांगलं काम करायला हवं, . नाम फाउंडेशनच्या वतीने आज खडकवासल्या जवळच्या बहुली येथे आगीत जळालेली 16 घरे बांधून देण्यात आली आहेत. ही घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर यांनी मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मुसलमानांना देखील इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे, ते पण इथलेच आहेत की. त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे.

सगळ्या गोष्टी सरकारच्या भरोश्यावर शक्य नाही जे जमेल ते प्रत्येकाने करा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, माझ्या सातबाऱ्यावर इतकं आहेत, तितकं आहे. असं लोक सांगतात पण माझ्या सातबाऱ्यावर खूप लोकं आहेत, असं मी अभिमानाने सांगतो. तसेच आपण एक दिवस जाणार आहोत यावर आपण कधी विश्वास ठेवणार आहोत, असंही नाना पाटेकर यावेळी बोलताना म्हणालेत.

Latest News