तहसीलदार ज्योती देवरे यांनी फक्त जीवन संपण्याचा विचार डोक्यातून काढून टाकावा – अण्णा हजारे


मला तुमच्यातल्या भांडणात पडायाचं नाही, कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत मी काही बोलणार नाही. पण तहसीलदार मॅडम मी तुम्हाला काय करायचं ते करा फक्त जीवन संपण्याचा विचार डोक्यातून काढून टाका, असा सल्ला अण्णा हजारे यांनी ज्योती देवरे यांना दिला आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली होती. या क्लिपमधून पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर त्यांचा रोष असल्याचं दिसून आलं. क्लिपमध्ये त्यांनी आपण आपलं जीवन संपवणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी तहसीलदार ज्योती देवरे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती त्यावेळी निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर पारनेरची बदमानी करण्याचं थांबवा, गरज पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेईल, असं अण्णा हजारे यांनी म्हणाले होते. यावर बोलताना निलेश लंके यांनी, ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला असल्याचं सांगितलं होतं…