पुण्यातील एका विवाहितेवर अमानुष अत्याचार…

पुणे : पुण्यातील गोखलेनगर परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहितेवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ घरगुती कारणावरून वाद पेटल्यानंतर पतीनं फिर्यादी महिलेला बेदम मारहाण करून भावजयीला टॉयलेट क्लिनर पाजलं या प्रकरणी पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

केवळ बहिणीसोबत फोनवरून बोलल्यामुळे पीडित महिलेचा घरातील मंडळींसोबत वाद झाला. फोनवर का बोलते असा जाब विचारत आरोपी पतीनं पीडितेला बेदम मारहाण केली. यानंतर घरातील अन्य एका महिलेनं पीडितेला घट्ट पकडलं आणि दीरानं घरातील हार्पिक हे टॉयलेट क्लिनर पाजलं आहे. टॉयलेट क्लिनर पाजल्यानंतर पीडितेची प्रकृती अचानक खराब झाली.

पोलिसांनी आरोपी पतीसह दीर आणि अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोखलेनगर परिसरातील रहिवासी असणारी 26 वर्षीय महिला आपल्या बहिणीसोबत फोनवरून बोलत होती. तिला प्रचंड त्रास होऊ लागला. त्यामुळे पीडितेला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या ठिकाणी पीडित महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडित महिलेनं चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह दीर आणि अन्य एका महिलेविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे

. केवळ आपल्या बहिणीसोबत फोनवरून बोलल्यामुळे एवढी भयानक शिक्षा दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या पीडितेचा जबाब नोंदवून घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास चतुःश्रृगी पोलीस करत आहेत.

Latest News