पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील हे अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळतात समस्या सोडवण्यासाठी सारथी अँप ठरतंय वरदान – माधव पाटिल

प्रेमलोक पार्क येथील पोलीस आयुक्तालय जवळील फुटपाथवर काही फलक चुकीच्या पद्धतीने फुटपाथच्या मधोमध लावले होते. त्याचा त्रास जेष्ठ नागरिक आणि सर्वच पादचाऱ्यांना होत होता.त्याची तक्रार राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव धनवे-पाटील यांनी सारथी ॲपवर आणि ट्विटरवर नोंदवली होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यावर तात्काळ कारवाई केली आणि फुटपाथवरील फलक हटवले आणि समस्या सोडवली.यासाठी माधव पाटील यांना ना कोणाला फोन करावा लागला ना कोणता अर्ज ना कोणत्याही संपर्क कार्यालयात ना सरकारी कार्यालयात जावे लागले. माधव पाटील म्हणतात की २०१३ साली त्यावेळचे आयुक्त श्रीकर परदेशी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने सारथी अँप पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत आले. आज त्याची धुरा सध्याचे आयुक्त राजेश पाटील हे अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळत आहेत.
एका आठडव्यातच समस्या सुटल्याने प्रेमलोक पार्क, इंदिरानगर, दळवीनगर , उद्योगनगर मधील जेष्ठ नागरिकसुद्धा समाधानी आहेत.माधव पाटील यांनी आवाहन केले की हे सारथी अँप तरुणांनी आपल्या भागातील आणि शहरातील समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वापरले पाहिजे.