स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा हिंजवडी पोलिसांनी टाकली धाड…
पिंपरी : बिल्स स्पा सेंटर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकून कारवाई केली. आरोपी पीडित महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होता. त्यातून मिळालेल्या पैशांमधून आरोपी आपली उपजीविका भागवत होता. पोलिसांनी महिलेची सुटका करून आरोपीला अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत
हिंजवडी पोलिसांनी व्हाईट स्केवर बिल्डिंग येथील बिल्स स्पा सेंटर येथे बुधवारी (दि. 25) सायंकाळी पाच वाजतेच्या सुमारास ही कारवाई केली.
करण राजेंद्र हजारे (वय 23, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी या प्रकरणी बुधवारी (दि 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. पीडित महिलेची सुटका करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.