सराईत दुचाकी चोरास अटक,चार लाखाच्या सतरा गाड्या जप्त क्राईम ब्रँच युनिट एक ची मोठी कारवाई

सराईत दुचाकी चोरास गुन्हे शाखा एक कडुन अटक, चार लाखाच्या सतरा गाड्या जप्त
पुणे : पुणे शहरात दुचाकी वाहन चोराची सख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने क्राईम ब्रॅच च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पोलीस कर्मचारी यांनी चोरांना पकडण्यासाठी आदेश देण्यात आले होते त्यानुसार क्राईम ब्रँच एक चे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना.पोलीस अमंलदार शशीकांत दरेकर दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सराईत वाहन चोर आरोपी समीर रांगावकर हा नवी पेठ, निबांळकर वाडा या ठिकाणी येणार आहे.
त्यानुसार गुप्तपणे सापळा लावला असता आरोपी समीर रोगावकर हा दुचाकीवर नवी पेठ निबांळकर वाडा, पुणे. या ठिकाणी आला. तो समीर रांगावकर असल्याची आमची खात्री होताच पोलीस असले बाबतची कोणतीही चाहुल लागु न देता त्यास शिताफीने मोटार सायकलसह ताब्यात घेतले.
कर्मचारी यांनी घटनास्थळावरील सी.सी.टि. व्ही. कॅमेन्याची पडताळणी केली असता एक इसम मोटार सायकल घेवुन जात असताना दिसून आला. त्या इसमाची अधिक माहीती मिळविली ता सदर इसमाचे नाव समीर रांगावकर असे असल्याचे समजले. त्याचा ठावठिकाणा नव्हता मात्र त्यास कसेही करुन जेरबंद करावयाचेच असा चंगच युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी बांधला
त्यांच्याकडे मिळालेल्या दुचाकीसह युनिट १. कार्यालय येथे आणून त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव सम्या ऊर्फ समीर दत्तात्रय रांगावकर वय ३४ वर्षे रा. ६५२/२ विसावा कॉप्लेक्स, विमाननगर, पुणे मुळगाव-मु.पो. रांगव ता.संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी असे असल्याचे सांगितले.
आरोपी सम्या ऊर्फ समीर दत्तात्रय रांगावकर याची पोलीस कोडठी रिमांड घेवून त्याचेकडे अधिक तपास करता त्याने प्रथम काही सांगण्यास नकार दिला. परंतु त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने पुणे शहर, पिंपरी चिचवड, पुणे ग्रामिण इ. ठिकाणावरुन मोटार सायकल्स चोरल्याचे कबुल करुन चोरी केलेल्या मोटार सायकल्स विक्रीकरीता लपऊन ठेवलेल्या जागा दाखवून किमंत रुपये ३,८०,०००/- च्या एकूण १६ मोटार सायकल्स काढून दिल्या.
कामी जप्त करून विश्रामबाग पोलीस ठाणेकडील 3. विश्रांतवाडी पोलीस ठाणेकडील १, विमानतळ पोलीस ठाणेकडील ३ येरवडा पोलीस ठाणेकडील १. चाकण पोलीस ठाणेकडील-२, भोसरी पोलीस ठाणेकडील-२, दिघी पोलीस ठाणे १,लोणावळा शहर पोलीस -१, राजणगांव पोलीस -१, निगडी पोलीस ठाणे१, असे १५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
ज्याची असेल त्यांनी युनिट १. गुन्हे शाखा पुणे शहर येथे संपर्क साधावा. असे आवाहन क्राईम ब्रँच नें केले आहे
सदरची कामगिरी मा.श्री अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे मा. श्री सुरेंद्रनाथ देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे -१, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शैलेश संखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १, गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक श्री सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस अंमलदार, शशीकांत दरेकर दत्ता सोनावणे, सतीश भालेकर, अमोल पवार, विजेसिंह वसावे, अशोक माने इम्रान शेख अय्याज दड्डीकर, अजय थोरात, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, राहुल मखरे, अनिकेत बाबर मिना पिजंण व रुक्साना नदाफ यांनी केलेली आहे. पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक श्री सुनिल कुलकर्णी करीत आहेत.