तडीपार रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार विनायक कराळे याला गुन्हे शाखेच्या युनिट एक कडून अटक
पुणे : गुन्हे शाखे चे युनिट एक चे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार हा सोनवणे हॉस्पिटल जवळ कासेवाडी पुणे येथे उभा असल्याची माहिती मिळाली.
त्यास सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले त्याची चौकशी केल्याने नाव विनायक बंडू कराळे वय 22 वर्ष रा. कासेवाडी पुणे असल्याचे सांगितले त्याची अंगझडती घेता 1 रॅम्बो चाकू मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध आर्म ॲक्ट 4(25) महा .पो.का.क.142 अन्वये फिर्याद देवून त्यास पुढील कारवाई कामी खडक पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
*खडक पोलीस स्टेशन गुरनं* 1.*295/2016 भादवि कलम 457,457,380*
*2. *गुरनं 4/2017 भादवि कलम 392*
*3.*गुरनं 132/2014 भादवि कलम 454,457,380,511*
*4.*गुरनं 23/2014 भादवि कलम461,457,380,34*
*5.*गुरनं 433/2017 भादवि कलम 380,34*
*6.*गुरनं 352/2016, 454,457,380,411,34*
*7. *गुरनं 358/2016 भादवि कलम 380, 411, 34*
*8.*351/2016 भादवि कलम 380,411,34*
*9.*344/2017 भादवि कलम 454 ,457 ,380 , 511*
*10 .*141/2018 भादवि कलम 379*
*11. *82/2019 भादवि कलम 394,341*
*12.*48/2018 भादवि कलम 392*
*13.*3033/2016 आर्म ॲक्ट 4(25)* 14.*3139/2015 म.पो.का कलम 142*
*15.*3038/2016 आर्म ॲक्ट 4(25)*
*16.*3264/2013 म.पो.का. कलम 37(1)* 17.*289/2017 भादवि कलम 454,457,380*
*18.*3012/2016 म.पो.का कलम 142,37(1) *सदर आरोपी विरुद्ध खडक पोलिस स्टेशन येथे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत*
*
सदरची कामगिरी पोलिस उप निरीक्षक संजय गायकवाड,सुनील कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार,अजय थोरात,अशोक माने , शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर, यांनी केली आहे.