जी व्यक्ती एक खाते सांभाळू शकली नाही ती व्यक्ती काय राज्य सांभळणार?

अमरिंदर सिंह म्हणाले, “पाकिस्तानचा पंतप्रधान त्यांचा (सिद्धू) मित्र आहे.  एवढच नाही तर जनरल बजावाशी  देखील याची मैत्री आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, त्यांनी सात महिने झाली अजून फाईल क्लिअर केली नाही. मी कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करणार नाही.  आतापर्यंत माझे कोणाशीही बोलणे झाले नाही. कोणाला मुख्यमंत्री बनवण्याचे या निर्णय कॉंग्रेस पक्षाने घ्यावा. कॉंग्रेसला ज्याला मुख्यमंत्री बनवायचे आहे त्याला बनवावे. परंतु त्यांनी सिद्धु यांना बनवले तर मी त्याचा विरोध करणार आहे. पंजाब काँग्रेसमधलं भांडण नवज्योत सिद्धु यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर मिटलंय असं वाटत असतानाच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे.  गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं कॅप्टन अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात खटके उडाले आहेत. आता राजीनाम्यानंतर  कॅप्टन अमरिंदर सिंह आक्रमक झाले असून त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याबाबत आपली भूमीका स्पष्ट केली आहे. अमरिंदर सिंह म्हणाले, “कॉंग्रेस पक्षाने जर नवज्योत सिद्धु यांना मुख्यमंत्री बनवले तर मी त्याचा विरोध करणार”.  “सिद्धु  जनरल बाजावा आणि इमरान खान यांच्यासोबत आहे.  नवजोत सिंह सिद्धू  माझ्या मंत्री मंडळात होता त्यांना बाहेर काढावे लागले. सात महिन्यात त्यांनी आपली फाईल क्लिअर केली नाही. जी व्यक्ती एक खाते सांभाळू शकली नाही ती व्यक्ती काय राज्य सांभळणार? असा प्रश्न देखील या वेळी उपस्थित केला. नक्कीच मुख्यमंत्री बनणे हेच त्यांचे (सिद्धू) ध्येय आहे.”, असे देखील अमरिंदर सिंह म्हणाले.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जात त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कल्पना दिली असल्याची माहितीही अमरिंदर सिंह यांनी दिली. राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंह यांनी म्हटलं की, ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्री बनवावं. सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली होती. मला सर्व रस्ते खुले आहेत. सर्व पर्यायांवर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल असं, अमरिंदर सिंह यांनी म्हटलं. 

Latest News