भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक कसे?

मुंबई : भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक कसे झालेत. भुजबळांनी अधिकार नसताना निधीचं वाटप केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडील असलेलं पालकमंत्रिपद काढून घ्या, अशी मागणी सुहास कांदे यांनी केली आहे भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत

. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असंही कांदे यांनी सांगितलं.  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करत आहेत. परंतु आता महाविकास आघाडीतील नेते एकमेकांनावर भ्रष्टाचाराचे आरोप करतना दिसत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापत आहे. यातच आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातला वाद विकोपाला पोहोचला आहे.

दरम्यान,  छगन भुजबळांनी निधी विकल्याचे 500 पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार कांदे यांनी केला आहे. त्यामुळे सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यात पुढे काय राजकीय घडामोडी घडणार हे आता पाहावं लागणार आहे.

Latest News