खोट्या चौकशा लावून लोकांची दिशाभूल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न: नाना पटोले

पुणे : देशांतर्गत प्रश्नावर केंद्रातील भाजप सरकारला काहीही देणे घेणे नाही लोकांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार विराेधकांच्‍या खोट्या चौकशा लावून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळे त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे महाविकास आघाडीने ठरविले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात आज (दि.२३) पत्रकार परिषदेत दिली

भाजप सरकार लसीकरणाचे सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मृत्यूचे तांडव होत असताना असा सोहळा करणे हे दुर्भाग्य आहे. देश आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला आहे.महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नामुळे देश ५० वर्षे मागे गेला

. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल जशास तसे उत्तर दिले असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले. साखर कारखाने भाजपचा लोकांनीही घेतले आहेत. त्यामुळे भाजपचे नेते कोणावर आरोप करीत आहेत ते कळले पाहिजे , असा सवालही त्‍यांनी केला.

Latest News