सर्व 65 साखर कारखान्यांची चौकशी करा : चंद्रकांत पाटिल

पुणे :राज्यातील 65 साखर कारखान्यांच्या विक्रीची यादी जाहीर केली होती. जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या 64 कारखान्यांची चौकशी करू नका, अशी आमची भूमिका कधीच नव्हती. उलट अजितदादांनी जाहीर केलेल्या सर्वच्या सर्व 65 साखर कारखान्यांची चौकशी करा अशीच आमची मागणी आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते
.जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे . या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली
..ऊर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी. उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री कमी किंमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे