आर्यन्स प्रतिष्ठानच्या शिबीरात 204 रक्तदात्यांनी रक्तदान केले

पिंपरी (दि. 23 ऑक्टोबर 2021) आर्यन्स प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्री उत्सवनिमित्त गुरुवारी (दि. 21 ऑक्टोबर) आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 204 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. फुलेनगर, भोसरी एमआयडीसी येथे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या कार्यालयाजवळ आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरात रक्तदान करणा-या सर्व व्यक्तींना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले
. या शिबाराचे आयोजन माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे आणि प्रियांका ननावरे यांनी केले होते. यावेळी रवींद्र ओव्हाळ, गोविंद खंडागळे, मंथन लोणकर, सुनील काची, मनोज मातंग, सुनिल धडके, रेहमान शेख, अकबर मुजावर, सावन गायकवाड, महेंद्र शिंदे, चांद शेख, सचिन पडदुने, आप्पा नेटके, गणेश झाडे, अक्षय सोनवणे, अलीबाबा शेख, सचिन कसबे, मयूर जाधव, रुपेश वाघमारे, विठ्ठल केंगारे, चेतन ननावरे, नाना सकट, शुभम यादव, राहुल नागनाळे, शंकर डिडुळ, सुनिल यादव, अविनाश वंजारे, रियाज शेख, बाळू निकम, मलिक फुलारे, गणेश सातपुते आदी उपस्थित होते.——————————–