पुण्यात जन्मदात्या आईनेच 3 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून

संबंधित महिला घटस्फोटीत आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे, या प्रश्नातून या महिलेने हा खून केल्याचा आरोप केला जात आहे.आपल्या 13 वर्षांच्या मुलाच्या मदतीने महिलेने तीन महिन्याच्या मुलीचा गळा दाबला. त्यानंतर तिला पुण्यातील बंडगार्डन पुलावरून नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली असून मुलालाही ताब्यात घेतले आहे.बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईनेच तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा निर्घृण खून केल्याचा आरोप आहे. पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार आईने केली होती. मात्र आपल्या बाळाचा तिनेच गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे.