पुणे महापालिके तील नगरसेवकांची संख्या 10 टक्क्यानी वाढणार…

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यातील नगरसेवकांची संख्या 183 इतकी होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार नगरसेवक संख्या निश्चित केली जाते, त्यासंबंधीतील कायद्याच्या तरतुदीत सुधारणा करण्यासंबंधीचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुण्यासह 30 लाखांवर लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्वच महापालिकातील नगरसेवकांची संख्या १० टक्‍क्‍यांनी वाढणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या तयारीला जवळपास सुरवात झाली आहे. ही निवडणुक शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यावेळेस शहराची लोकसंख्या 32 लाख 31 हजार 143 इतकी होती. त्यात 2017 मध्ये 11 गावांचा समावेश झाला, त्यांची लोकसंख्या 2 लाख 39 हजार 483 इतकी होती, आता नव्याने पुन्हा 23 गावांचा समावेश झाला, या गावांची लोकसंख्या 1 लाख 85 हजार 198 आहे. त्यानुसार शहराची एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी आहे.

मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम 1949 च्या 2016 च्या कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार 30 लाख लोकसंख्येला 161 नगरसेवक, तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक असा नियम आहे. त्यानुसार आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 166 इतकी निश्चित करण्यात आली आहे

. या निकषानुसार राज्य निवडणूक आयोगाने 3 तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार 54 प्रभाग 3 चे तर एक प्रभाग 4 सदस्यांचा करण्याच्या सूचना महापालिकांना दिल्या आहेत.संबंधित बातम्या दरम्यान लोकसंख्याच्या निकषानुसार नगरसेवकांची संख्या निश्चित होत असली तरी, 2011 ची लोकसंख्या आणि प्रत्यक्षात आत्ताची लोकसंख्या यात मोठी तफावत आहे. आता ही तफावत दूर करण्यासाठी ज्या कायद्यातील तरतुदीनुसार नगरसेवक संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्या कायद्यातच सुधारणा करण्याची भुमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.

त्यामुळे 30 लाख लोकसंख्येला 161 नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक या तरतूदीत बदल करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरविकास खात्याकडून येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

या सुधारीत कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 10 टक्के इतकी वाढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. लोकसंख्येच्या निकषानुसार सद्यस्थितीत 166 नगरसेवक होत आहे. त्यात 10 टक्के वाढ म्हणजे ही संख्या 17 इतकी वाढून होऊन 183 इतकी होईल. त्यात प्रत्येक जातीयनिहाय लोकसंख्यानुसार आरक्षित जागांची संख्या वाढणार आहे.

Latest News