सर्वांचे पहिले ध्येय महापालिकेतील ”भाजपला” पराभूत करणे हे…
पिंपरी : काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच सांगितले की, आम्ही स्वबळावर लढणार आहे. कोणामध्ये किती बळ आहे, हे सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाचे बळ अधिक आहे, असे समजू, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या ताठर भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली.काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच सांगितले की, आम्ही स्वबळावर लढणार आहे. कोणामध्ये किती बळ आहे, हे सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाचे बळ अधिक आहे, असे समजू, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या ताठर भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली. सर्वांचे पहिले ध्येय महापालिकेतील ”भाजपला” पराभूत करणे हेसर्वांचे पहिले ध्येय महापालिकेतील ”भाजपला” पराभूत करणे हे आहे अस मत अजित पवार यांनी व्यक्त केले
मात्र आपल्या सध्याच्या ताकदीनुसार जागा वाटप झाल्यास आम्हाला काहीच अडचण नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाआघाडीबाबत सूतोवाच केलेज्या वेळी मित्रपक्ष समन्वयाची भूमिका घेतात तेव्हा आपणही दोन पावले पुढे-मागे व्हायचे असते, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला लगावला
.पिंपळे-गुरव येथील निळू फुले नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवार (दि.10) समारोप झाला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होतेआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची मानसिकता दर्शविली आहे. मात्र, आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले आहे. कोणाचे किती बळ आहे.याचा पंचनामा करायला नको;
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे मनापासून काम करायचे. त्याला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावायची. तू मला या वॉर्डात मदत कर, मी तुला तुझ्या वॉर्डात मदत करतो, असले येथील प्रकार बंद करा.त्याचा फटका काम करणार्या कार्यकर्त्यांना बसतो. घरभेदी असेल तर काहीही होत नाही, अशा विविध सूचना करीत पवार यांनी पदाधिकार्यांना सक्त ताकीद दिली.
या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेना कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता दिसत आहे, हे वृत्तपत्रात वाचले. आपले मित्र समन्वयाची भूमिका घेतात. तशी मानसिकता ठेवतात. त्याप्रमाणे आपणही सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे सर्वांचे पहिले ध्येय महापालिकेतील भाजपला पराभूत करणे हे आहे. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. येणारी परिस्थिती व पक्षाची ताकद पाहून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.आंध्रा व भामा-आसखेड धरणाचे पाणी शहरासाठी मंजूर केले. पण, भाजपला ते पुढे नेता आले नाही, अशी टीका करताना पवार म्हणाले की, शहराचा चहुबाजूने विकास होत आहे.
वाढते नागरीकरण व लोकसंख्या वाढीचा दर पाहता एकट्या पवना धरणाचे पाणी शहराला पुरणार नाही. हे माहित असतानाही सत्ताधार्यांनी नियोजन केले नाही. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणी मिळत आहे.पवार म्हणाले की, भाजपची केंद्र, राज्य व पालिकेत सत्ता होती. पालिकेत आताही आहे. पण, भाजपने अनधिकृत बांधकामाचा, शास्तीकराचा प्रश्न निकाली काढला नाही.केवळ मते मिळविण्यासाठी लोकांना भूलथापा दिल्या. हे नागरिकांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पेव्हिंग ब्लॉक, रस्त्याशिवाय काहीच कामे झाली नाहीत.
मात्र, सन 2017 मध्ये भाजपच्या खोट्या-भूलथापांना बळी पडून नागरिकांनी भाजपकडे पालिकेची सूत्रे दिली. तेव्हापासून शहर विकासात मागे पडले आहे.लाचखोरी प्रकरणामुळे शहराची बदनामी झाली. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती वाढल्या. महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील प्रश्न सोडवित आहोत. राष्ट्रवादीचीच सत्ता चांगली होती, असे नागरिक आता बोलून दाखवत आहे.
राजकारणात इतर पक्षासोबतच्या व्यक्तींशी मित्रत्वाचे संबंध असतात. परंतु, ते संबंध कुठपर्यंत असावेत. त्याचे आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपली भूमिका अधिक आक्रमकपणे लोकांसमोर मांडू, त्यावेळेस जननेला ते समजते, असे अजित पवार म्हणाले.
मॅच फिक्सिंग; मला माहीत आहे!
केवळ फ्लेक्सवर ‘नमामि इंद्रायणी’ म्हणून नदी पात्रातील जलपर्णी निघत नाही. शहर खड्डेमय झाले आहे. नियोजन नाही. सुनियोजित विकास केला नाही.आमच्या काळातील बेस्ट सिटी पाहिजे की आताची स्मार्ट सिटी पाहिजे हे लोकांना विचारले पाहिजे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शहरातील नागरिकांनी पक्षाला ताकद दिली.पक्षाची सत्ता असताना सर्वांना विश्वासात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास केला. शहर अत्यंत नियोजनबद्धपणे वसविले आहे.वेळप्रसंगी वाईटपणा घेऊन रस्ते प्रशस्त केले.उड्डाणपूल, सब-वे, स्टेडिमय केले. देश, जगाच्या पातळीवर शहराचे नाव पोहोचविले.
कोणाचे काय चालले आहे, कोण मॅच फिक्सिंग करते, ते सर्व मला माहित आहे. ते सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. माझेही विरोधकांशी संबंध चांगले होते. परंतु, मी कधीही कोणाशी फिक्सिंग केली नाही.