ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या लसीकरणाला गती द्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना निवेदन नगरसेविका नम्रता लोंढे –


ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या लसीकरणाला गती द्या : नगरसेविका नम्रता लोंढे
– महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे. इथले बहुतांश नागरिक कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह करतात. कोरोनाच्या दोन्ही लाटेतून सावरल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कंपन्यांनी पुन्हा उभारी घेतली आहे. आता शहरातील बहुतांश कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा देखील सुरळीत होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी लसीकरण मोहिमेला गती द्यावी, अशी मागणी भाजपा नगरसेविका नम्रता लांढे यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या शहरातील कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या असल्या तरी कंपन्यांमध्ये काम करणा-या सर्व कामगारांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. एमआयडीसीतील कामगारांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 60 टक्के पूर्ण झाला आहे. अद्याप अनेक जणांचे लसीकरण होणे बाकी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटचा शहरात शिरकाव झाला असून राज्यात सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले आहेत. त्यामुळे कामगारांचे लसीकरण पूर्ण क्षमतेने होणे आवश्यक आहे.
महापालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कंपन्यांमध्ये जाऊन देखील लसीकरण मोहीम राबविल्यास त्याचा कामगारांना फायदा होईल. एका कंपनीत शंभर पेक्षा अधिक कामगार काम करत असल्याने लसीकरण मोहीम वाढण्यास देखील त्याचा उपयोग होईल.
सध्या लसीकरणापासून अनेक कामगार वंचित आहेत. कंपन्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविल्यास, लसीकरणाची जनजागृती केल्यास कामगार पुढे येऊन लसीकरण करतील. याबाबत महापालिकेने सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही नगरसेविका नम्रता लोंढे यांनी केली आहे.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या लसीकरणाला गती द्या : नगरसेविका नम्रता लोंढे- महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना निवेदनपिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे. इथले बहुतांश नागरिक कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह करतात. कोरोनाच्या दोन्ही लाटेतून सावरल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कंपन्यांनी पुन्हा उभारी घेतली आहे. आता शहरातील बहुतांश कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा देखील सुरळीत होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी लसीकरण मोहिमेला गती द्यावी, अशी मागणी भाजपा नगरसेविका नम्रता लांढे यांनी केली आहे.याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या शहरातील कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या असल्या तरी कंपन्यांमध्ये काम करणा-या सर्व कामगारांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. एमआयडीसीतील कामगारांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 60 टक्के पूर्ण झाला आहे. अद्याप अनेक जणांचे लसीकरण होणे बाकी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटचा शहरात शिरकाव झाला असून राज्यात सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले आहेत. त्यामुळे कामगारांचे लसीकरण पूर्ण क्षमतेने होणे आवश्यक आहे.महापालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कंपन्यांमध्ये जाऊन देखील लसीकरण मोहीम राबविल्यास त्याचा कामगारांना फायदा होईल. एका कंपनीत शंभर पेक्षा अधिक कामगार काम करत असल्याने लसीकरण मोहीम वाढण्यास देखील त्याचा उपयोग होईल.सध्या लसीकरणापासून अनेक कामगार वंचित आहेत. कंपन्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविल्यास, लसीकरणाची जनजागृती केल्यास कामगार पुढे येऊन लसीकरण करतील. याबाबत महापालिकेने सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही नगरसेविका नम्रता लोंढे यांनी केली आहे.