फेक आयडीद्वारे पैसे मागितल्यास पोलिस तक्रार करा: पि.चि.आयुक्त राजेश पाटिल यांचे नागरिकांना आवाहन


पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या आयुक्त राजेश पाटिल यांच्या बोगस नावाने पैशाची मागणी
फेक प्रोफाईल आयडीद्वारे पैसे मागितल्यास पोलिस तक्रार करा: आयुक्त राजेश पाटिल यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी : फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये.अशा प्रकारे कोणतीही मागणी करण्यात येत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करुन ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसवण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेल कडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे.
या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्र. 7524891151 या नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग करुन आर्थिक मदतीची विचारणा केली आहे. तसेच मोबाईल क्र. 7977510080 या क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे.पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या आयुक्त राजेश पाटिल यांच्या बोगस नावाने पैशाची मागणी फेक प्रोफाईल आयडीद्वारे पैसे मागितल्यास पोलिस तक्रार करा: आयुक्त राजेश पाटिल यांचे नागरिकांना आवाहन पिंपरी : फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये.अशा प्रकारे कोणतीही मागणी करण्यात येत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करुन ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसवण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेल कडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्र. 7524891151 या नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग करुन आर्थिक मदतीची विचारणा केली आहे. तसेच मोबाईल क्र. 7977510080 या क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे.