बारामतीत पर्यटनाचे बुकिंग घेणाऱ्या युवतीवर चाकू हल्ला…
बारामती: सकाळी साडे दहा वाजता केसरीच्या रजत टुर्सचे कार्यालय उघडल्यानंतर एका युवकाने आतमध्ये प्रवेश केला. मी सोमवारी कार्यालयात येवून गेलो, परंतु तुम्ही कार्यालय लवकर बंद केले असे म्हणत या युवकाने युवतीच्या गळ्यात हात घातला.
बुकिंग घेणाऱ्या युवतीवर चाकू हल्ला करण्यात आला. एका तरुणाने हा हल्ला केला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या हल्ल्यात युवतीच्या हातावर जखम झाली आहे.आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरतोय की काय अशी शंका तिला आल्याने तिने त्याचा हात धरला. माझा हात सोड, असे म्हणत हातावर चाकूचा वार करत हा युवक पळून गेला.
घाईत चप्पल न घालताच तो युवक दुचाकीवरून पसार झाला. बारामती शहरातील नीरा डावा कालव्याशेजारी असणाऱ्या पूर्वा कॉर्नर कॉम्प्लेक्समधील केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये घडला
मंगळवारी (दि. १८) सकाळी पर्यटनाचे युवतीने कार्यालयाबाहेर येत त्याचा पाठलाग केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या हल्ल्यात युवतीच्या हातावर चाकू लागून जखम झाली. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे
दरम्यान सोमवारी सुद्धा या परिसरात हा युवक दोन तास येवून बसल्याची माहिती पुढे येत आहे. या हल्ल्यात युवतीच्या एका बोटाला दुखापत झाली असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले