रशिया-युक्रेन संघर्षामुळे अनेक भारतीय तेथे अडकून आपले नागरिक आणण्याचे प्रयत्न सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यात आता 51 टक्कांनी कोरोनाची घट झाली असून दर 4.4 टक्के आहे. त्यामूळे लसीकरण हे जास्तीत जास्त होत असून आणखीन प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. तसेच आता पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहेत. परंतु कोरोना नियमांचे पालन करावे लागेल आणि पालकांना वाटले तरच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे, असेही अजित पवार म्हणाले. रशिया-युक्रेन संघर्षामुळे अनेक भारतीय तेथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत अजित पवार म्हणाले, 1200 ते 2000 हजार लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत. 366 पालकांशी संपर्क आणि बोलणे सुरू आहे. त्यांच्याशी नियंत्रण कक्षामार्फत बोलणे सुरू आहे. त्यांना प्रशासनाकडून मोबाईल नंबर, ई मेल दिलेले आहेत. तसेच काही जणांना आज मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन् आमचे याकडे लक्ष आहे. आपले नागरिक आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सरकारच नागरिकांना आणण्याचा खर्च करत आहे, कोणीही याबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात पुणे येथे बोलताना भाष्य केले. ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर निवडणुका घ्या असे सर्वांनी निवडणूक आयोगाला सांगितलेले आहे. कारण त्या समाजाला नेतृत्व मिळायला पाहिजे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा निकाल हा लवकर लागला पाहिजे. आणि त्यानंतर निवडणुका होतील, असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, 1 मार्च पासून जम्बो हॉस्पिटल बंद होणार आहे, याबाबत महापौर यांच्याशी चर्चाही सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टरांशी कोरोना रूग्णसंख्येबाबत चर्चा झाली आहे
आता रूग्णसंख्या पहाता हॉस्पिटलची गरज नाही म्हणून बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. परंतु कोरोनाचे नियम शिथिल करणार का नाही याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.