मोठ्या युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ; इमॅन्युएल मॅक्रॉन

रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरु असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की मित्रराष्ट्रांकडे मदत मागत आहेत. झेलेन्स्की यांनी नुकतीच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन तसेच पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांशी राजनैतिक पातळीवर चर्चा केली.

मित्रराष्ट्रांकडून शस्त्रांची मदत येत असून युद्धविरोधी भूमिका कायम असल्याचे त्यांनी झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. यातच मॅक्रॉन यांनी मोठ्या युद्धासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे

.रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु असतानाच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी महत्वाचे विधान केले आहे. जगाने युक्रेनमधील मोठ्या युद्धासाठी तयार रहावे, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. युरोपमध्ये युद्धाची स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी हे युद्ध एकतर्फी पुकारले आहे, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. पण या युद्धासोबत येणाऱ्या संकटांचे कायमस्वरुपी परिणाम होतील, असे भाष्य त्यांनी केले आहे

.हवाई हल्ल्यानंतर आता युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील रस्त्यांवर संघर्ष सुरु आहे. रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या काळ्या समुद्रातील एका बेटावर रशियन सैनिकांनी बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली असताना युक्रेनच्या सैन्याने रशियाचे १००० सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाचे एक हजारपेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याच्या वृत्ताला युक्रेनच्या संरक्षण विभागाने दुजोरा दिला आहे

.युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियन आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. तिसऱ्या दिवशी शनिवारी कीव्हमध्ये तीव्र लढाई सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. कीव्ह शहरातील वासिल्किव भागात जोरदार संघर्ष सुरु असल्याची माहिती युक्रेनियन सशस्त्र दलाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. रशियाच्या लष्करी विमानावर हल्ला केला असून यात शत्रुचे मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनियन सशस्त्र दलाने म्हटले आहे.

Latest News