नगरसेवकांनी मंजूर केलेल्या विकासकामाची पाहणी करणार:पुणे महापालिका आयुक्त: विक्रम कुमार

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – आगामी निवडणूक लक्षात महापालिकेचा कार्यकाळ संपण्याच्या अंतिम टप्प्यात विकास कामांना मंजुरी मिळवली. मात्र मतदारांना खुश करण्यासाठी नगरसेवकांनी मंजूर केलेल्या विकासकामाची पाहणी केली जाणार आहे. याशिवाय, मार्चच्या अखेरीस देण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची कामे प्रत्यक्षात झालेली आहेत की नाहीत याची तपासणीही क्षेत्रीय कार्यालये तसेच महापालिकेच्या दक्षता विभागाकडून करून घेतली जाणार आहे. यात 25 टक्के कामाची तपासणी क्षेत्रीय कार्यालये तर 75 टक्‍के कामांमधील संशयास्पद कामांची तपासणी दक्षता विभागा करणारा असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली

महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्यानंतर प्रशासनाने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. राजकीय पक्षाची दालने ताब्यात घेत असताना दालनांमधील सर्व फाइल गोळा केल्या जात आहेत. महापालिकेशी संबंधित वस्तू, कागदपत्रे एकत्र करून त्यांची नोंद करून हा सर्व दस्तावेज स्टोअर रुममध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर 31 मार्चनंतर येथे कार्यरत असलेले सर्व कंत्राटी सेवक हे कार्यमुक्‍त केले जाणार आहेत

. याबरोबरच पदाधिकाऱ्यांच्या दालनात कार्यरत असलेल्या स्वीय सहायक, लिपिक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती नगरसचिव कार्यालयात केली जाणार आहे. त्याबाबतच्य आदेशाचे पत्रही काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने  प्रशासकाचा कार्यकाळ सुरु झाला आहे, महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांनी नुकतीच पहिली बैठक घेतली. त्यानंतर आता महापालिकेतील राजकीय दालनाचा ताबा घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

याबरोबरच मी महापालिकेतील कंत्राटी सेवकांनाही सेवा मुक्त करण्याचा विचार आहे . राजकीय दालनाचा ताबा घेता असताना येथील तेथे लागलेली पक्षाची चिन्हे , झेंडे, झाकण्यात आले आहेत . तर बरीच कार्यालये सील करण्यात आली आहे. यामध्ये महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती, विविध पक्षनेते यांच्या दालनाचा समावेश आहे.

Latest News