धनधांगड्याना गाळे ,वाटप, खरे फेरीवाले वाऱ्यावर, चुकीचे गाळे वाटप थाबवा अन्यथा तीव्र आंदोलन : बाबा कांबळे


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – कृष्णानगर कस्थुरी मार्केट येथिल टपरी पथारी हातगाडी धारकांना ओटे बांधून गाळे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आले,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली परंतु प्रत्यक्ष मात्र व्यवसाय करतात ज्यांचे त्या ठिकाणी व्यवसाय आहेत अशांना गाळे वाटप करण्याऐवजी, जय स्वतःचा व्यवसाय करत नाहीत व ज्यांनी स्वतः लायसन काढून गाळे भाड्याने दिले आहेत अशांनाच गाळे वाटप करण्यास सुरुवात आले यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या महिला पुरूषांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ करण्यास सुरुवात केली, यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे,
यांनी घटनास्थळी सर्व फेरीवाल्यांना भेट देऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले, आणि क्षेत्रीय कार्यालय येथील अधिकारी श्री भवरे यांच्यासोबत चर्चा करून ही प्रक्रिया थांबून जे खरे फेरीवाले आहेत त्यांनाच गाळे वाटप करावे अशी मागणी केली,
यावेळी बाबा कांबळे म्हणाले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने फेरीवाला कायदा मंजूर केला असून या अंतर्गत शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांना सर्वे करून त्यांना पक्के गाळे देणे पक्याचे ठिकाणी लाईन पाण्याची व्यवस्था करणे आदी प्रक्रिया प्रलंबित आहे,
परंतु महानगरपालिकेच्या वतीने मात्र ही प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीरपणे ज्यांच्याकडे लायसन आहेत व जे प्रत्यक्ष व्यवसाय करत नाहीत अशांना गाळे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली, यास आमचा तीव्र विरोध असून प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय करण्याचा खरा लाभार्थ्यांना गाळे मिळाले पाहिजे अन्यथा ही प्रक्रिया आम्ही हाणून पाडू आणि तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा यावेळी बाबा कांबळे यांनी दिला,
छाया जितेंद्र खुरंगळे, पूजा दादासाहेब कांबळे, आम्हाला पल्लवी प्रवीण दाखले, रत्नमाला गौतम नाही भांदन, कविता कुमार थोरात, सोनल भाऊसो फरकाटे, भाग्यश्री बंडू शेलार, सोना प्रभू वाघिरे, कावेरी मुकुंदर काळ, वंदना पवार, सारिका जोगदंड, सीमा विजय काळे,
हे सिस्ट मंडळामध्ये उपस्थित होते