पुणेरी पॉट आईस्क्रीमची परंपरा अजूनही लक्षवेधी

पुणेरी पॉट आईस्क्रीमची परंपरा अजूनही लक्षवेधी
……..
मधुमेही रुग्णांसाठी शुगर फ्री आईसक्रीम
…….
पॉट आईस्क्रीम ची लज्जत पुणेकरांच्या भेटीस
…….
उन्हाळा सुसह्य करण्यासाठी घरगुती पॉट आईसक्रीम !

पुणे 🙁 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ): पुणेकरांच्या उन्हाळ्यामध्ये जिव्हाळ्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या लाकडी पॉट मधील आईस्क्रीम ला पुनर्जीवित करण्यात अस्सल पुणेकर म्हणून शिरीष बोधनी यशस्वी ठरले असून या उन्हाळ्यात देखील त्यांनी घरगुती चवीचे, मेहनतीचे पॉट आईस क्रीम पुणेकरांच्या भेटीस आणले आहे.

वैशिष्ट्य म्हणजे मधुमेह असणाऱ्या पुणेकरांना देखील या आईस्क्रीमची लज्जत चाखता येणार असून त्यासाठी वेगळा शुगर फ्री आईस्क्रीमचा प्रकार शिरीष बोधनी यांच्या शिरीष आईस्क्रीम द्वारे उपलब्ध झाला आहे .

पुण्यातील उन्हाळ्याला अनेक दशकांपासून स्पॉट आईस्क्रीमने लज्जत मिळवून दिली आहे. वाड्यामध्ये सहकुटुंब पॉट फिरवून, बर्फ , मीठ टाकून, स्वतःच्या मेहनतीचे आईस्क्रीम तयार करणाऱ्या पुणेकरांना थेट घरोघरी आईस्क्रीम पुरवण्याची सेवा शिरीष बोधनी यांनी अनेक दशकांपूर्वी सुरू केली होती. त्यांच्या बरोबरचे पॉट आईस्क्रीम व्यवसायिक थांबले तरी बोधनी यांनी या उन्हाळ्यात देखील पॉट आईस्क्रीम पुणेकरांच्या साठी उपलब्ध केले आहे.

आंबा ,सीताफळ या पुणेकरांच्या आवडत्या स्वादांमध्ये हे पॉट आईस्क्रीम उपलब्ध असून यावर्षी खास शुगर-फ्री आईस्क्रीम देखील बोधनी यांनी उपलब्ध करून दिले आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपक्रमाची माहिती दिली .

यावेळी त्यांनी आईस्क्रीम तयार कसे होते, पुण्यात परंपरा का टिकून आहे आणि पॉट आईस्क्रीम ची लज्जत खास वेगळी का असते याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले निव्वळ दूध आणि अस्सल फ्लेवर त्यामुळे पॉट आईस्क्रीम पुण्यात नावाजले जाते. यामध्ये कोणतीही भेसळ नसते आणि ते कृत्रिम पदार्थ टाकून अधिक लज्जतदार केले जात नाही. आईस्क्रीमचा मूळ स्वाद टिकून राहण्यासाठी आईसक्रीम ची प्रक्रिया पुणेकरांच्या पसंतीसही उतरली आहे. आता बाजारात फ्रोझन डेझर्ट नावाखाली पाम तेलाचे आइसक्रीम उपलब्ध असले तरी ते आरोग्यास हानिकारक आहे, हे इंटरनेटमुळे अनेकांना कळल्यामुळे जुन्या अस्सल स्वादाच्या आइस्क्रीम कडे पुणेकरांचा ओढा वाढला आहे. मधुमेही रुग्णांसाठी आम्ही फक्त काजू आणि पिस्ता याचा उपयोग करून शुगर फ्री आईस क्रीम आणले आहे .पुणेकरांनी या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे . शिरीष बोधनी यांच्याकडे या आईस्क्रीमची नोंदणी केल्या नंतर डूंझो सेवेमार्फत ते घरोघरच्या ग्राहकांना दिले जाते.

शारीरिक अडचणीमुळे शिरीष बोधनी यांनी हा जो सेवेचा पर्याय निवडला आहे आणि पुणेकरांनी नव्या स्वरूपात या सेवेला पसंती दिली आहे

पु.ल. देशपांडे, पुण्यभूषण कडून पॉट आईसक्रीमचे कौतुक
……………………….
खुद्द पु. ल.देशपांडे यांनी स्वतः कमला नेहरू पार्क येथील त्यांच्या घरी आइसक्रीम मागवून, कौतुक केले होते.
खासदार श्रीनिवास पाटील ,ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ आदी मान्यवर यांनी पॉट आईस्क्रीमच्या स्वादाचे कौतुक केले.
डॉ. सतीश देसाई यांच्या पुण्यभूषण संस्थेतर्फे ‘ पक्का पुणेकर ‘ म्हणून शिरीष पॉट आईसक्रीमला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.