पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी इन्क्युबेशन सेंटरला विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी इन्क्युबेशन सेंटरला विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा

ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायोफार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्रांची घेतली माहिती

पिंपरी, ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना:) २८ मार्च २०२२ : पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवउद्योजक आणि स्टार्टअप यांना चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरला आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचा अभ्यासदौरा स्मार्ट सिटी इन्क्युबेशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गाचे २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, प्रा. बाबुराव पावसे, व्यवस्थापक उदय देव, जस्टीन मॅथेव्ह, आदित्य मासरे, राजेंद्र घाडगे आदी उपस्थित होते.

कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी इन्क्युबेशन सेंटरच्या कामकाजाची माहिती दिली. ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायोफार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता आदी क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरचे कामकाज सूरू आहे. सुरुवातीला ८ स्टार्टअप कार्यरत होते. स्टिव्हल ऑफ द फ्युचर या सारख्या इन्हेंटद्वारे नव स्टार्टअपला प्रोत्साहित करण्यात येते. इन्क्युबेशन सेंटरकडे आता १२ मार्गदर्शकांची टीम असून सध्या एकूण ३० स्टार्टअप सक्रियपणे कार्यरत आहेत. इनक्यूबेट्स तसेच स्टार्टअप्समध्ये आवश्यक ज्ञानासह पिंपरी चिंचवड आणि पुणे क्षेत्रात आजपर्यंत एकूण १३ सत्रे झाली आहेत. इनक्यूबेट्ससाठी कॅप्सूल कोर्स सुरू करण्यात आला असून ६ आठवड्यांचा कोर्स दर मंगळवारी (विनामूल्य) दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येतो. तसेच, नवनिर्मीतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मुंबईतील गुंतवणूकदारांना आमंत्रित करून स्टार्टअपला सादरीकरणाची संधी देण्यात येते, यामध्ये १८० हून अधिक पीसीएमसी स्टार्टअपनी सहभाग घेतला आहे. याबाबत माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांनी प्रश्नांचे निराकरण करून घेतले. प्रा. बाबुराव पावसे यांनी उत्कृष्ठ माहिती दिल्याबददल आभार मानले.

Latest News