डॉ. श्रीकांत केळकर यांना सुश्रुत पुरस्कार

पुणे :

राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे संचालक आणि ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘सुश्रुत पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. देशातील नेत्रतज्ज्ञ प्राध्यापकांची संघटना असलेल्या ‘फोरम ऑफ ऑफ्थल प्रोफेसर ऑफ इंडिया’ यांच्यातर्फे छत्तीसगड येथे आयोजित विशेष परिषदेत हा सन्मान करण्यात आला.

डॉ.केळकर यांनी पुण्यातील केईएम रुग्णालयात १९७३ पासून नेत्ररोग विभागाचे काम केले.१९८३ ला ते विभागप्रमुख झाले. पुणे विद्यापीठ,शिवाजी विद्यापीठ, तसेच गुजराथ विद्यापीठाच्या परीक्षेला परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
डॉ.बानू कोयाजी,डॉ.मस्कती (मुंबई) यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळू शकले,अशा भावना डॉ.श्रीकांत केळकर यांनी व्यक्त केल्या.

Latest News