OBC आरक्षण :सुप्रीम कोर्टानं महापालिका निवडणुक पुढील सुनावणी 25 एप्रिल ला

nivdnuk

नवी दिल्ली : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली असून ती आता 25 एप्रिल रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत कोर्टाकडून याचिका फेटाळली जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अशी आशा इच्छूक उमेदवारांची होती. त्यासाठी ते आजच्या सुनावणीकडे डोळे लावून बसले होते. पण त्यांची निराशा झाली. त्यामुळं महापालिके निवडणुकांची स्थिती सध्या जैसे थेच असणार आहे.ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यानं राज्यातील महापालिका निवडणुका सध्या लांबवणीवर पडल्या आहेत. मुदत संपलेल्या महापालिकांवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. आज यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. पण आजची सुनावणीही पुढे ढकलल्यानं इच्छुकांची निराशा झाली आहे.

Latest News