डॉ इंद्रेशकुमार यांच्या उपस्थितीत डॉ. लतिफ मगदूम यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा…………………………….धर्माच्या नावावर हिंसा नको, बंधु भाव वाढवला पाहिजे :

डॉ इंद्रेशकुमार यांच्या उपस्थितीत डॉ. लतिफ मगदूम यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा…………………………….धर्माच्या नावावर हिंसा नको, बंधु भाव वाढवला पाहिजे : इंद्रेशकुमार

पुणे :डॉ. लतिफभाई मगदूम स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मुस्लीम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक डॉ. इंद्रेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. लतिफ मगदूम यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम बुधवार दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पद्ममजी हॉल, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता-स्वारगेट येथे झाला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ.भा. कार्यकारिणी सदस्य , मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार, माजी कुलगुरू डॉ.एस.एन. पठाण,अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव जगताप, मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय समन्वयक विराग पाचपोर, श्रीमती सरोजिनी मगदूम, माया प्रभुणे, युवराज बेलदरे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. लतिफ मगदूम यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान रोजा इफ्तार चे आयोजन करण्यात आले .प्रतिष्ठानतर्फे शांतीवन वृद्धाश्रमाला ११ हजार,बाल अनाथगृह(घोडेगाव) ला ११ हजार,दहावी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या १४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्येकी १ हजार रुपये या कार्यक्रमात देण्यात आले.आंतरधर्मिय विवाह करणाऱ्या तीन दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.पी. ए. इनामदार यांनी लतीफभाई मगदूम प्रतिष्ठानला १० लाख देणगी जाहीर केली.

इंद्रेशकुमार म्हणाले, ‘ समाजात चांगले पद अनेकांना मिळते, पण, त्याचा सदुपयोग करणाऱ्याचे स्मरण पिढयानपिढया केले जाते.लतिफ मगदूम यांनी समाजकार्यात आदर्श निर्माण केल्याने त्यांचे स्मरण केले जाईल.सत्कर्म करा हीच सर्व धर्मग्रंथांची शिकवण आहे. लतीफ मगदूम यांनी सत्कार्माची पदचिन्हे ठेवली आहेत. ते सर्वसमावेशक भारतियत्वाचे प्रतिक होते.देशात अस्वस्थता आहे. अशा वेळी दंगलीचा, हिंसेचा निषेध केला पाहिजे.

सर्व सण सर्व धर्मियांनी एकत्रित साजरे केले पाहिजे. धर्माच्या नावावर हिंसा नको बंधु भाव वाढला पाहिजे. भारतात शांतता नांदली पाहिजे. बुलडोझर कोणत्या धर्मावर नाही तर गुंडावर चालवलेला आहे. द्वेष पूर्ण भाषणे करणाऱ्यांवरही कारवाई झालेली आहे.द्वेश शिकवला जात नाही, पण, चांगुलपणा शिकवावा लागतो.नेतेमंडळींनी चांगुलपणा वाढविण्यासाठी काम केले पाहिजे.डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ सर्वसमावेशकता हे तत्व घेऊन लतीफ मगदूम यांच्यासमवेत आम्ही आझम कॅम्पसमध्ये काम केले. त्यांचे काम कृतीने जिवंत राहील .’डॉ.एस.एन. पठाण म्हणाले, ‘ लतीफ मगदूम यांचे मन फुलासारखे कोमल होते.

ते संस्थेतील सर्वांची काळजी घेत असत. ते विश्वधर्मी होते.’राजीव जगताप म्हणाले, ‘ प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लतिफ मगदूम आणि मी कार्यरत राहिलो. शिवजयंती ची तारीख शासकीय समितीने निश्चित केल्यावर शैक्षणिक संस्थांमध्ये शिवजयंती मिरवणूक सुरू झाली. लतिफ मगदूम यांनी उत्साहाने आझम कॅम्पसमध्ये ही मिरवणूक सुरू केली………….डॉ. लतीफ मगदूम हे महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव होते. तरुण वयात युवक काँग्रेसच्या चळवळीत असलेल्या मगदूम यांचा पुण्यातील हिराबाग गणेश मंडळ, समाजवादी अद्यापक सभा, सामाजिक संस्थांशी घनिष्ट संबंध होता. राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे प्रदेश समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘ लतीफभाई मगदूम स्मृती प्रतिष्ठान ‘ ची स्थापना करण्यात आले आहे……….

Latest News