महिलांवर हात टाकणं हि भाजपा ची संस्कृती, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील .

rupali thomare patil

मुंबई | भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना सध्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आता याप्रकरणावरून रूपाली पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केलीये.महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती आहे. मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशारा रूपाली पाटील यांनी भाजपला दिला आहे

.स्वतःच्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढे करता का ? इतरांच्या महिलांना मारहाण होते तेव्हा काय ? विचारला सवाल रुपाली पाटलांची उपस्थित केला. आता गुन्हा दाखल झाला आहे.अटक करून कारवाई करा, आता सुरुवात आहे अजून करारा जवाब मिळेल, असं रूपाली पाटील म्हणाल्यात

.पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने आंदोलन केलं. बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला

Latest News