भाजपचा एक छोटा कार्यकर्ता काँग्रेस अध्यक्षाला हरवतो ही बाब काँग्रेसला लागली : स्मृती इराणी

पुणे | आपल्या अध्यक्षाला भाजपचा एक छोटा कार्यकर्ता हरवतो ही बाब काँग्रेसला लागली आहे. त्यामुळे तेव्हापासूनच ते माझ्यावर टीका करत असतात. राष्ट्रवादी तर काँग्रेसमधून निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांचाही माझ्यावर राग असणं स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया स्मृती ईराणी यांनी दिली

भाजपा चा एका साधारण कार्यकर्त्याने त्यांच्या अध्यक्षाला पराभूत केलं. त्यांच्या अध्यक्षाला पराभूत केल्याचं काँग्रेसला सदैव दु:ख राहिल, असा खोचक टोला देखील स्मृती ईराणी यांनी लगावला आहे.भाजप नेत्या स्मृती ईराणी एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आज पुण्यात आहेत. यावेळी स्मृती ईराणी ज्या हॉटेलमध्ये उतरल्या त्याखाली राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आंदोलनाला सुरूवात केली

.महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने स्मृती ईराणीविरोधात जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या आंदोलनावरून स्मृती ईराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षाला पराभूत केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचा माझ्यावर राग आहे, असा टोला स्मृती ईराणी यांनी लगावला आहे

Latest News