महापालिका निवडणूक १६ जून रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार

राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत येत्या 31 मे रोजी होणार आहे. १ जून ते ६ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे.

हरकती व सूचनांचा विचार करून १६ जून रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 31 मे रोजी आरक्षण सोडत होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे जाहीर करण्यात आले आहे. सोडतीनंतर प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Latest News