ज्यांनी तुरूंगात माझा छळ केला त्यांचा जवाब नोंदविण्यासाठी समितीला विनंती करणार : खा नवनीत राणा


मुंबई : ज्यांनी तुरूंगात माझा छळ केला आणि माझ्यासोबत तुरूंगात जे काही घडलं ते सगळं मी समितीसमोर मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
तर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह ज्या ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी मला त्रास दिला त्यांचा जबाब नोंदवण्याची मी विनंती करणार असल्याचं म्हणत नवनीत राणांनी मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे.
दरम्यान, माझ्यावर जो अत्याचार झाला तो इतर कोणावर होऊ नये यासाठी मी प्रयत्न करणार आहे. संविधानाचा खून करत माझ्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबत आदेश देणाऱ्यांनाही आता उत्तर द्यावं लागेल, असंही नवनीत राणा म्हणाल्या
.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टहास धरलेल्या राणा दांपत्याला तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 11 दिवसांच्या कोठडीनंतर राणा दांपत्याची तुरूंगातून सुटका झाली तुरूंगात असताना पोलिसांनी मला त्रास दिला
. मुंबई पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारीबाबत म्हणणं मांडण्यासाठी नवनीत राणा आज संसदीय अधिकार समितीसमोर हजेरी लावणार आहेत