राष्ट्रीय विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे-पंतप्रधान नरेंद्र मोदी


मुंबई :. महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रांनी देशाला प्रेरित केले आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळा आदी संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याबद्दल बोलायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते. आज दरबार हॉलमधून समुद्राचा विस्तार दिसतो तेव्हा मला स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांच्या वीरतेचे स्मरण होते,” असे पंतप्रधान म्हणाले.“
मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही, तर महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत, जी २१व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनणार आहेत. या विचाराने एकीकडे मुंबईतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होत आहे आणि त्याचवेळी इतर शहरांमध्येही आधुनिक सुविधा वाढवल्या जात आहेत. मेट्रो विस्तार, राज्यभरात सुरु असलेले नॅशनल हायवे पाहिले तर विकासाची सकारात्मक दृष्टी दिसते. राष्ट्रीय विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे
मी याआधीही राजभवनात आलो आहे. राजभवानाच्या इतिहासाला आधुनिकतेचे स्वरुप दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या अनुरुप शौर्य, आस्था, आध्यात्म आणि स्वातंत्र्य चळवळीच्या भूमिकेचेही दर्शन होते. इथून महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन सुरु केलेली जागा लांब नाही. या भवनाने स्वातंत्र्याच्या वेळी तिरंग्याला अभिनाने फडकताना पाहिले आहे. आता जे नवीन रुप झाले आहे त्यामुळे राष्ट्रभक्तीची मूल्ये आणखीन सशक्त होतील. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे.
देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक सेनानी आणि महान व्यक्तीमत्वाच्या व्यक्तीला आठवण्याची ही वेळ आहे,” असेही नरेंद्र मोदी आज एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले होते. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले.
यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. “एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य समरातील वीरांना ही वास्तू समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राचे राजभवन गेल्या काही दशकांमध्ये अनेक लोकतांत्रिक घटनांचे साक्षीदार आहेत. आता येथे जलभूषण भवन आणि राजभवनात बनवलेल्या क्रांतीकारकांच्या गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले आहे
. या कार्यक्रमात मला सहभागी होण्याचे भाग्य मिळाले,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले“