क्रांतीगाथा या दालनाचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते ,एक मोठा योगायोग म्हणण्यापेक्षा खूप चांगला मुहूर्त- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :. “आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना क्रांतीगाथा या दालनाचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं आहे. एक मोठा योगायोग म्हणण्यापेक्षा खूप चांगला मुहूर्त आहे. मी कोणत्या नजरेने पाहायचं हे एवढ्यासाठी म्हटलं की, आपण नेहमी काही गोष्टी ऐकत आलो की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. बोलायचं काय? जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत, ते मिळवण्यासाठी किती जणांनी आपल्या घरादारांवर निखारे ठेवले. किती जणांनी त्यासाठी बलिदान केलं. किती जणांनी मरणप्राय यातना सोसल्या आणि एक क्षणभऱ विचार असा येतो की जर का हे घडलं नसतं. तर आपण इथे येऊ शकलो असतो का?

पुढील १०० वर्षे या वृत्तपत्राचं नरेंद्र मोदी यांच्या हाताने लोकार्पण व्हावं आणि आपलं जे गुजराती आणि मराठीचं नातं आहे ते अधिकाधिक दृढ होत जावं.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत

.मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे मी गुजराती समजू शकतो बोलू शकत नाही. आणि एखाद्या वृत्तपत्राला २०० वर्षे होतात यावर मला विश्वास बसत नाही.” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

“मला अभिमान आहे महाराष्ट्रात २०० वर्षे गुजराती वृत्तपत्र यशस्वी वाटचाल करतंय आणि हेच तर आपलं नातं आहे. गुजराती आणि मराठी दुधाच साखर मिसळल्यासारखं ” असं मत त्यांनी व्यक्त करत मराठी गुजराती भाषेतील नातं दाखवून दिलं आहे.

“भारताच्या २०० वर्षापूर्वीचा इतिहात या वृत्तपत्राच्या कार्यालयात आपल्याला मिळेल. काही वृत्तपत्र चळवळीच्या वेळी जन्म घेतात. आजसुद्धा केसरी १४१ वर्षापासून चालू आहे, वर्तमानपत्र ऐतिहासिक कामं करत असतात.” असं ते म्हणाले आहेत

.कार्यक्रमास राज्यापाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री अशोक चव्हाण आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी भाषणात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “ क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी जेवढं केलं, त्यापैकी एक कण जरी आपण देशासाठी करू शकलो तरी ते कृतार्थ होतील. ” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

Latest News