मोदी है तो मुमकीन है’ मी आठ वर्षांनी म्हणतो – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई :. औरंगाबाद मध्ये नागरिकांनी माझ्याकडे येत पाणी प्रश्न उपस्थित केला होता. आम्हाला पाच ते सात दिवस पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली होती. असे अनेक प्रकल्प आहे जे रखडले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे प्रश्न निकाली लागतील. अरुण जेटली सर्वांत अगोदर म्हणाले होते ‘मोदी है तो मुमकीन है’. मी आठ वर्षांनी म्हणतो ‘मोदी है तो मुमकीन है’, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  म्हणाले.

मागील काही दिवसांपासून औरंगाबादचा पाणी प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. या पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेत मुख्यमंत्र्यांसमोरच ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत हल्ला चढवला.

औरंगाबादच्यापाणी प्रश्नाला घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला होता. अद्याप पाणी प्रश्न निकाली न निघाल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले होते. तसेच या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले होते यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. यांची औरंगाबादमध्ये सभा पार पाडली. यावेळी त्यांनी तो मोर्चा सत्तेसाठी केलेला आक्रोश मोर्चा होता, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला होता. आमच्या अगोदर तुमचीच सत्ता होती. मग का नाही सोडवला पाण्याचा प्रश्न असा प्रश्नही विचारला होता

Latest News