सावरकर अंदमानात साखळदंडाच्या चिपळ्या करून तुकारामाचे अभंग गात होते ही निव्वळ थाप – काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन


मुंबई : पंतप्रधान यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या अन् तुकारामांचे अभंग म्हटले. यावरुन आता जोरदार टीका केली आहे.
सावरकर व तुकाराम…सावरकर यांच्या लिखाणात तुकाराम किंवा कोणत्याही संताचा उल्लेख नाही. त्यामुळे अंदमानात साखळदंडाच्या चिपळ्या करून तुकारामाचे अभंग ते गात होते ही निव्वळ थाप आहे.” अशा शब्दांत काँग्रेस चे नेते रत्नाकर महाजन यांनी मोदींवर हल्लाबोल केला
. पंतप्रधानांच्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिळा मंदिर केवळ भक्तीच्या शक्तीचे केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही सशक्त करणारे केंद्र असल्याच्या भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
“मस्तक माझे पायांवरी, या वारकरी संतांच्या” या ओळींनी भाषणाची सुरूवात केली. या वेळी संत तुकाराम महाराजांच्या अंभगातील अनेक ओळी म्हणत त्या आजच्या काळात देखील कशा उपयुक्त आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या अन् तुकारामांचे अभंग म्हटले. त्यांचे अभंग हे जेवढे भागवत भक्तासाठी महत्वाचे आहेत, तेवढेच ते राष्ट्रनिर्मीतीसाठी महत्वाचे आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.