माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नकोय याचं मला दु:ख:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई :जर माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय करायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर विरोधकांना नाही पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नकोय याचं मला दु:ख, आश्चर्यच नाही तर धक्का बसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले
सुरत किंवा दुसरीकडे कुठुन बोलण्यापेक्षा माझ्या समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.दरम्यान, मला कोणताही मोह नाही. मी शिवसेना पक्षप्रमुखांचा मुलगा आहे. मला समोर येऊन सांगा मी माझा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तयार ठेवला आहे
. आज सध्याकाळी मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच समोर येत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे