पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक – एकनाथ शिंदे


मुंबई :अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. 2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
त्याशिवाय 3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. तर चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याच्या थेट मत व्यक्त केले आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तांतराचं सुरू झालेलं वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाहीये. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकच्या माध्यामातून संवाद साधाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर म्हणून चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदेनीअगदी सूचक ट्वीट केले आहे. शिंदे यांचे हे दिवसभारातील दुसरं ट्वीट असून, यामध्ये त्यांनी चार मुद्द्यांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी म्हणजेच 3.29 मिनिटांनी शिंदेनी एक ट्वीट केले होते. शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर आज शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदेच्या या ट्वीटमुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद शिगेला पोहचला असल्याचे म्हटले होते.