पिंपरी चिंचवड शहर उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करणार – ॲड. सचिन भोसले

IMG-20221117-WA0255

पिंपरी चिंचवड शहर उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करणार – ॲड. सचिन भोसले

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी पिंपरीतील शेकडो महिलांच्या हाती शिवबंधन…

पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२२) – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक प्रेरित झाले आहेत. येत्या काळात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे हात अधिक बळकट करणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी केले.

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन आज पिंपरी विधान सभेतील शेकडो महिलांनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी “निस्वार्थ भावनेने पक्षसंघटनेसाठी जोमात काम करा, येणारा काळ पक्षासाठी नक्कीच सुवर्णकाळ ठरेल” असे सांगत शहरप्रमुखांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.पक्ष प्रवेशाची ही नांदी असून पुढील महिन्यात भोसरी, पिंपरी, चिंचवड मतदार संघातून शेकडो प्रमुख कार्यकर्ते व हजारो नागरिक उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करणार आहेत, असे ही ॲड. भोसले यांनी सांगितले

.यावेळी पुनम रिटे, रोहिणी पवार, सविता पवार, रुपाली सरोदे, रोहिणी रघुवंशी, लक्ष्मी कांबळे, लक्ष्मी कसबे , राधाताई तुपे यांसोबत शेकडो महिलांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शहरप्रमुख सचिन भोसले, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, उपजिल्हासंघटिका वैशाली मराठे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, पिंपरी विधानसभा संघटिका वैशाली कुलथे, युवराज कोकाटे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधत सर्व महिलांचे पक्षात स्वागत केले

. याप्रसंगी दिपक भक्त, तस्लीम शेख, अंकुश पवार, कामिनी मिश्रा, रजनी वाघ, गजानन धावडे, अभिमन्यू लांडगे, कलावती नाटेकर, कुदरत खान, विशाल साळवी, श्रीकांत चौधरी, संदीप भालके, बाबासाहेब भोंडवे, मच्छिंद्र देशमुख, मारुती शिंदे, महादेव अवसरमल, सतीश मरळ, संतोष म्हात्रे, प्रवीण पाटील, बेबी सय्यद, ॲड. दत्ताराम साळवी, विशाल चव्हाण, रजनी वाघ, कामिनी मिश्रा, मनोहर कानडे, किशोर सवाई, सुब्रमण्यम शेखर, गीता कुसाळकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.——-

Latest News