पिंपरी चिंचवड शहरात ब्रेस्ट कॅन्सर (मेमोग्राफी) मोफत तपासणीची शंभर शिबिरे घेणार – डॉ. भारती चव्हाणमानिनी फाऊंडेशनचा उपक्रम


पिंपरी चिंचवड शहरात ब्रेस्ट कॅन्सर (मेमोग्राफी) मोफत तपासणीची शंभर शिबिरे घेणार – डॉ. भारती चव्हाणमानिनी फाऊंडेशनचा उपक्रम
पुणे, पिंपरी ( दि . १७ नोव्हेंबर २०२२) महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढले आहे. या विषयी महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ब्रेस्ट कॅन्सर (मेमोग्राफी) तपासणीची मोफत शंभर शिबिरे घेणार आहे. या मध्ये प्रथम शिबिरार्थींची नोंदणी करून तपासणी केली जाईल, अशी माहिती मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
.या मोफत शिबिरांचे आयोजन मानिनी फाउंडेशन, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चिंचवड, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
यातील पहिले शिबिर शनिवारी (दि.१९ नोव्हेंबर)रूपीनगर बौद्ध विहार, समाज मंदिर येथे सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केले आहे. यामध्ये सुमारे शंभर पेक्षा महिला शिबिरार्थींची तपासणी केली जाणार आहे.
यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून इच्छुक महिलांनी रूपाली हाताळे – 9021132341, नुरी पटेल – 9168008332 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच यातील दुसरे मोफत शिबिर 22 नोव्हेंबर रोजी कामगार कल्याण मंडळ, दळवीनगर, चिंचवड येथे होणार आहे.
नाव नोंदणीसाठी अश्विनी दहितुले – 7385903471, अमृता नवले – 7776011888 यांच्याशी संपर्क साधावा.पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात मोफत शंभर शिबिरांच्या आयोजनाचा संकल्प असून यासाठी शहरातील महिला मंडळ, बचत गट, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, कंपनी, बॅंका, गृहनिर्माण संस्था यांनी डॉ. भारती चव्हाण – (व्हाॅटस ॲप मो. नं. 9763039999) यांच्याशी संपर्क साधावा. अधिकाधीक महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले आहे.——