पिंपरीत शनिवारी पत्रकारांचे एक दिवसीय अधिवेशन; जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, प्रसिद्ध रेडिओ आर.जे.बंड्या राहणार उपस्थित


पिंपरीत शनिवारी पत्रकारांचे एक दिवसीय अधिवेशन; जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, प्रसिद्ध रेडिओ आर.जे.बंड्या राहणार उपस्थित
पिंपरी, 18 नोव्हेंबर – अखिल मराठी पत्रकार संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने उद्या (शनिवारी) पत्रकारांचे एक दिवसीय अधिवेशन आयोजित केले आहे. त्यानिमित्त दिवसभर परिसंवादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, प्रसिद्ध रेडिओ आर.जे.बंड्या यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शनिवारी सकाळी नऊ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अध्यक्षस्थानी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे असणार आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजपचे चिंचवड विधानसभा प्रमुख शंकर जगताप, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील जेष्ठ वकील ऍड.अद्वैत चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
या एकदिवसीय अधिवेशनात दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. छायाचित्रांचे प्रदर्शन भरणार आहे. जेष्ठ पत्रकारांचा परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा घडणार आहे. दिल्लीत पत्रकारिता करणारे जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून दिल्लीतील राजकारण समजून घेता येणार आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील जेष्ठ वकील ऍड.अद्वैत चव्हाण हे सोशल व डिजिटल मीडियाचे सकारात्मक, नकारात्मक परिणाम याबाबत उपयुक्त असे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा पत्रकारिता करताना मोठा फायदा होईल. त्याशिवाय प्रसिद्ध रेडिओ आर.जे.बंड्या उपस्थितांचे मनोरंजन करणार आहे. शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनी या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे करण्यात आले