कलासक्त ‘ च्या पहिल्या मैफलीला चांगला प्रतिसाद !.डॉ. कल्याणी बोंद्रे यांचे बहारदार गायन


कलासक्त ‘ च्या पहिल्या मैफलीला चांगला प्रतिसाद !*……………………*डॉ. कल्याणी बोंद्रे यांचे बहारदार गायन*
पुणे:’कलासक्त, पुणे ‘ आयोजित मैफलीला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. या मैफलीत डॉ. कल्याणी बोंद्रे यांनी बहारदार शास्त्रीय गायन प्रस्तुत केले.कलासक्त पुणे प्रस्तुत कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही ही स्वरमैफल बेडेकर गणपती मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडला.’कलासक्त, पुणे’ या संस्थेचे विश्वस्त श्रीरंग कुलकर्णी, रवी सहस्त्रबुध्दे, माधुरी वैद्य, डॉ.विनीता आपटे आणि रसिक पुणेकर कार्यक्रमाला उपास्थित होते. डॉ. विनीता आपटे यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. बोंद्रे यांना सुयोग कुंडलकर(संवादिनी),मोहन पारसनीस(तबला ),वसंत देव(तालवाद्य) यांनी साथसंगत केली. मैफलीचे निवेदन अरविंद बोंद्रे यांनी केले. शाम कल्याण,बागेश्री, पहाडी अशा रागांमधल्या चिजा व नाट्यगीत, अभंग आणि भैरवी सादर करून डॉ कल्याणी बोन्द्रे यांनी रसिकांची वाहवा मिळवली.
डॉ. कल्याणी बोंद्रे यांच्या मैफलीची सुरुवात राग श्यामकल्याण मधील विलंबीत एकतालातील ‘जीओ मेरे लाल ‘ या बंदीशीने झाली. यानंतर ‘ बेला सांज की सुखद सुहावनो भयो ‘ ही बंदीश सादर केली. राग बागेश्री मधील मध्य लयीतील बंदीश ‘ छेड करत नंदलाल देखो राधे ‘ आणि तराना ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘रंगी सारी गुलाबी चुनरीया रे ‘ या पहाडी रागातील दादरा सादर केला.राग बागेश्री मधील मध्य लयीतील बंदीश ‘ छेड करत नंदलाल देखो राधे ‘ आणि तराना ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘रंगी सारी गुलाबी चुनरीया रे ‘ या पहाडी रागातील दादरा सादर केला.
‘ हे बंध रेशमाचे ‘ या नाटकातील भीमपलास रागातील ‘ काटा रुते कुणाला ‘ हे नाटयगीत सादर केले. बोंद्रे यांनी स्वतः स्वरबद्घ केलेली गझल सादर केली. ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंगाने रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमाची सांगता ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया ‘ या भैरवीने झाली. उदयोन्मुख शास्त्रीय गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
कलेच्या प्रांतातल्या सर्वच कलांना प्रोत्साहन देणे, हा कलासक्त चा उद्देश आहे. श्रीरंग कुलकर्णी, डॉ विनिता आपटे, माधुरी वैद्य, रवी सहस्त्रबुद्धे यांनी मिळून ही संस्था स्थापन केली आहे. प्रयोगशील संगीतकारांना, वैविध्यपूर्ण कार्यक्रमाना व्यासपीठ निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. डॉ कल्याणी बोंद्रे यांच्या बहारदार गायनाने कलासक्त च्या उपक्रमांना सुरवात झाली