संदीप वाघेरे यांच्या वतीने जिजामाता रुग्णालयास डेंटल चेअर व एक्स रे मशीन दान…


संदीप वाघेरे यांच्या वतीने जिजामाता रुग्णालयास डेंटल चेअर व एक्स रे मशीन दान…
पिंपरी प्रतिनिधी – कै.सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी म्हणून पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयास डेंटल चेअर व एक्स रे मशीन हि उपकरणे मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने दान करण्यात आली. याविषयी अधिक माहिती देताना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांना बळकट करणे हा या उपक्रमाचा मुळ उद्देश आहे.
पिंपरी परिसरातील नागरिकांना दंतरोग उपचार करणेकामी महापालिकेच्या वाय.सी.एम.रुग्णालयांमध्ये अथवा खाजगी रुग्णालयामध्ये जावे लागत होते.नागरिकांना दंतरोग उपचार सुलभरित्या मिळणेकामी आणि भविष्यात रुग्णांना सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये चांगल्या सुविधा देणेकामी हा उपक्रम केला असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास सहा.वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, माजी नगरसेवक विनोद नढे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, डॉ.सुनिता साळवे,डॉ.अल्वी नासेर,सामाजिक कार्यकर्ते संतोष हांडे,राजेंद्र वाघेरे, राकेश मोरे.सिस्टर इन्चार्ज किरण गायकवाड,सिस्टर इन्चार्ज माधुरी चारिया,सिस्टर इन्चार्ज मीना संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.गोफणे म्हणाले कि, महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील सर्वच नागरिकांना योग्य वैद्यकीय सुविधाचा लाभ मिळणेबाबत प्रयत्न केला जात असतो,
महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा देत असताना कोणीतरी आपल्या मार्गावर सतत आपल्याला मदतीचा हात देत रुग्णसेवेचा मार्ग सुखकर व आनंददायी करण्याचा प्रयत्न करीत असते ती व्यक्ती म्हणजेच संदीप वाघेरे आहेत