लतादीदींची ३० सह पार्श्वगायकां समवेत गायलेली गाणी रसिकांच्या भेटीस !……….’ लता के रंग ‘ कार्यक्रमाचे ७ डिसेंबर रोजी आयोजन


लतादीदींची ३० सह पार्श्वगायकां समवेत गायलेली गाणी रसिकांच्या भेटीस !……….’ लता के रंग ‘ कार्यक्रमाचे ७ डिसेंबर रोजी आयोजन
पुणे :भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासमवेत 30 पार्श्वगायकांनी गायलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यात रसिकांच्या भेटीस येत आहे.
ऱ्हीदम एंटरटेनमेंट प्रस्तुत हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. आरती दीक्षित, राजाभाऊ तिखे, मिनाक्षी गायकवाड, मिलिंद जोशी, प्रसाद केळकर हे कार्यक्रम सादर करणारआहेत.
. क्रांती शहा यांचे निवेदन आहे. ध्वनी व्यवस्था अमोल कोळेकर यांची आहे.व्हिडिओ विक्रम अंबिके. देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध आहेत.तलत महमूद ते उदित नारायण अशा ३० पार्श्वगायकांनी लता मंगेशकर यांच्यासमवेत गायलेल्या गीतांचा नजराणा या निमित्ताने रसिकांच्या भेटीस येत आहे