भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

IMG-20221205-WA0170

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दिनांक 5 व 6 डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही सामाजिक न्याय विभागा तर्फे शिवाजीपार्क येथे अभिवादन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी दिली.

सामाजिक न्यायविभागा तर्फे दिनांक 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत समता पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्त जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

दिनांक 5 व 6 रोजी दादर येथील शिवाजीपार्क येथे महाराष्ट्रातुन येणाऱ्या अनुयायांना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याकरीता विविध महामंडळे, सफाई आयोग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पार्क दादर येथे प्रसिध्दी स्टॉल उभारण्यात येणार आहेत

. तसेच शिवाजी पार्क परिसरात योजनांच्या माहिती एल.ई.डी. स्क्रीन व्दारे प्रसिध्द करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिना निमित्त उपस्थित रहाणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजन देण्यात येणार आहे.

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमास मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मा.ना.दिपक केसरकर , सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री.सुमंत भांगे,समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Latest News