प्राईड इन्क्लुजन स्कूलचे बाणेर मध्ये उदघाटन —शिक्षणा बरोबर चांगले संस्कार देणे आवश्यक : त्यागराज खाडिलकर


प्राईड इन्क्लुजन स्कूलचे बाणेर मध्ये उदघाटन ———-शिक्षणा बरोबर चांगले संस्कार देणे आवश्यक : त्यागराज खाडिलकर
पुणे :ब्राह्मण महासंघ संचालित ज्ञानगंगा एज्युकेशनल अँड सोशल इन्स्टिट्यूट (DESI) या संस्थेच्या प्राईड इन्क्लुजन स्कूल या पहिल्या पूर्व प्राथमिक शाळेचं उदघाटन बाणेर बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ गायक त्यागराज खाडिलकर यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या उपस्थितीत झाले.’सभोवताली घडत असलेल्या घटना, कुटुंब परिवारात पडत असलेले अंतर पाहता सध्याच्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणा बरोबरच चांगले संस्कार आणि कौटुंबिक प्रेमाची शिकवण सुद्धा आवश्यक आहे आणि ‘देसी’संस्थेची नवीन शाळा याची नक्कीच पूर्तता करेल’,असे प्रतिपादन खाडिलकर यांनी उदघाटन प्रसंगी केले.’लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना मातृभाषा ची गोडी निर्माण करावी, त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळण्यासाठी देसी ने प्रयत्न करावे’,असे सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी सुचवले.’येणाऱ्या शैक्षणिक वर्षात राज्यभरात ‘देसी’ च्या आणखी काही शाखा काढण्याचे नियोजन आहे,असे अर्चना मराठे यांनी या वेळेस सांगितले. या वेळेस ‘प्राईड इन्क्लुजन स्कुल’ च्या सौ.अस्मित वैद्य,’देसी’संस्थेच्या अध्यक्ष सौ.अर्चना मराठे, मैत्रेयी पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ.लता दवे, सौ.आसावरी दिवाण, सौ.तृप्ती तारे, सौ.आदिती जोशी, संजय देशमुख, चैतन्य जोशी,मनोज तारे,राहुल आवटी उपस्थित होते.सौ.मेघा म्हसवडे यांनी सूत्रसंचालन केले…….