शांततेच्या मार्गाने सीमा प्रश्ना बाबतची कृती केली पाहिजे- सुप्रिया सुळे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याची दखल शाह यांनी घेतली आहे,””महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या वाचाळवीरांची माहिती आम्ही अमित शाह यांना दिली आहे,” असे सुळे म्हणाल्या. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्व पक्ष बैठक बोलवावी,” असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहेकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार आहेत.सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भेटीबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे माध्यमांना माहिती दिली”शांततेच्या मार्गाने सीमा प्रश्ना बाबतची कृती केली पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे हा आमचा आग्रह आहे, या प्रश्नावरुन हिंसा होऊ नये,” असे सुळे यांनी सांगितले.राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ” सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवल बोलणे झाले आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलून समन्वयाने या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली. अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला,”