चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ला हा दुर्देवी- देवेंद्र फडणवीस


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पाटील यांच्या वक्तव्याचा आशय समजून घ्यायला हवे. त्यांच्या वक्तव्यातील काही शब्दावर विवाद होऊ शकतात. मात्र आशय हा होता की, आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांनी सरकारी अनुदान न घेता, त्यांनी शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी, समाजातील दानशूर लोकांची सोबत घेतली एवढंच त्यांना म्हणायाचं होतं. मात्र एका शब्दाला पकडून, असा हल्ला करणं, चुकीची गोष्ट आहे
दरम्यान, पाटील यांनी पैठण येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उद्घाटन कार्यक्रमस्थळी तणाव होता. ‘पाटील यांना शहरात पाउल ठेवू देणार नाही’, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता.
या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. पाटील सायंकाळी पाचच्या सुमारास मंदिर परिसरात आलेउद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजपचे (BJP) कार्यकर्ते मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी पा़टील चहापानासाठी थांबले