रिक्षा चालकाने 12 तारखेच्या बेकायदेशीर संपात सहभागी होऊ नये : बाबा कांबळे

पिंपरी / प्रतिनिधी*काही रिक्षा संघटनांनी बेकायदेशीर पणे एकत्रित येऊन १२ डिसेंबर रोजी रिक्षाचा बंद पुकारला आहे. मात्र त्याला पुणे जिल्हाधिकारी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तसेच रिक्षा चालकांनी बंद करू नये, असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या बंद मध्ये महाराष्ट्र राज्य ऑटो, रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन, महाराष्ट्र रिक्षा पंचायत सहभागी होणार नसल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. आंदोलन दरम्यान कोणी रिक्षाचे तोडफोड केली तर ताबडतोब पोलिसांना कळवावे 112 नंबर ला कॉल करावा, खो पोलिसांची मदत घ्यावी, रिक्षा चालकांनी देखील या बेकायदेशीर बंद मध्ये सहभागी होऊ नये, असेही आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

पुणे पोलीस उपायुक्त कार्यालय झोनच्या स्मार्थना पाटील यांची भेट घेतली, *चाकण येथे रिक्षा चालक मालकांची घोंगडी बैठक घेऊन बाबा कांबळे यांनी यावेळी त्यांनी हे आवाहन केले,

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, विकास त्रिकोणे अतुल भाऊ नाणेकर, मिथुन शिंदे, कैलास नाना वलांडे राजू शिंदे ,पोपट खांडेभराड, सुरज ठोंबरे, प्रशांत रणसिंग, संदेश लोखंडे, नबिन शेख, जितेंद्र घाटकर, सचिन येडे, महाजन विलास सरक आदी उपस्थित होते* .रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत सातत्याने आंदोलने, मोर्चा आयोजित करत आहेत. शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.

बेकायदेशीर रॅपीडो कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. संघटनेच्या मागणीला यश मिळाले आहे. रॅपीडो कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आदींसह अनेक मागण्या संघटनेने लावून धरल्या आहेत. कायदेशीर मार्गाने संघटना आंदोलन करत आहे.

आंदोलनादरम्यान कुठेही गालबोट लागू नये याची दक्षता संघटना घेत आहे. मात्र काही चुकीच्या लोकांनी रिक्षा चालकांची दिशाभूल करून संघटना बांधल्या आहेत. त्यांच्या कडून रिक्षा चालकांना अडचणीत टाकण्याचे काम केले जात आहे. या बेकायदेशीर संघटना १२ डिसेंबर रोजी बंद पुकारत आहेत. मात्र या बंदला शासनाकडून कोणतीही परवानगी दिली नाही. तसेच आंदोलन करताना रस्त्यातच रिक्षा उभ्या करण्याची चुकीची भूमिका या संघटना घेत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच रिक्षा चालकांनी बंद करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाकडून मुदत मागितली आहे. त्यामुळे महाराष्ट्र रिक्षा पंचायत, संयुक्त कृती समिती, ऑटो रिक्षा चालक मालक फेडरेशन या मध्ये सहभागी होणार नाही. मात्र प्रशासनाने योग्य तोडगा न काढल्यास १९ डिसेंबर पासून कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. रिक्षा चालक मालकांनी १९ डिसेंबरच्या या बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

Latest News