शिंदे गटाच्या नेत्या आशा मामिडीयांनी सुषमा अंधारेंवर हल्लाबोल….


Pune- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडीओंत अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या विधानांवरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. तसेच महानुभाव पंथाने देखील अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. माफी मागितल्यानंतर देखील विरोधाची धार कमी न झाल्यामुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडला आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली जाते. मात्र, अंधारे सध्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर माफी मागून देखील त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता शिंदे गटा्च्या महिला नेत्यानं सुषमा अंधारे या वाघीण नसून माकडीण अशी बोचरी टीका केली आहे.आता याच दरम्यान शिंदे गटाच्या नेत्या आशा मामिडीयांनी सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला आहे. मामिडी म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी उजेड बाजूला केला असून अंधार जवळ केला आहे. अंधारे या वाघीण नाही, तर माकडीण आहेत. त्या उद्धव ठाकरे यांच्या उरलेल्या शिवसेनेला संपवायला निघाल्या आहेत अशी घणाघाती टीका मामिडी यांनी केली आहे.तसेच अंधारे यांना आम्ही रामायण आणि महाभारत ग्रंथ भेट देणार आहोत. वेळ पडली तर त्यांना चोपही देऊ. त्यांची पळता भुई थोडी होईल. महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहेमामिडी यांनी अंधारे यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा आणि दुसऱ्यांना माकड म्हणावं. पक्षासाठी त्यांचे आतापर्यंतचे योगदान काय आहे? केवळ प्रसिद्धी मिळावी यासाठी त्या कुणावरही काहीही बोलत आहेत. अंधारे फक्त सुपारी घेऊन काम करत करतात असाही आरोप मामिडी यांनी यावेळी केला आहे.